जून 6, 2018
510, आर्मी बेस वर्कशॉप क्रेडिट को-ऑपरेटिव प्रायमरी बँक लि., मीरत कँट ह्यांना आरबीआयकडून दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, 510, आर्मी बेस वर्कशॉप क्रेडिट को-ऑपरेटिव प्रायमरी बँक लि., मीरत कँट ह्यांना रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लावला आहे. हा दंड सुयोग्य अनुपालनाबाबत वेळेवर सादरीकरण करणे, आंतर-बँकीय ग्रॉस एक्सपोजर व काऊंटर पार्टी मर्यादा, क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांकडून (सीआयसी) सभासदत्व मिळविणे, इनवेस्टमेंट पोर्ट फोलियोंची लेखा तपासणी करणे, आणि डिपॉझिटर एज्युकेशन व अवेअरनेस फंड ह्या सर्वांवर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबद्दल लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3186 |