दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्र प्रदेश ह्यांचेवर दंड लागु |
जून 6, 2018
दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्र प्रदेश ह्यांचेवर दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्र प्रदेश ह्यांना रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लावला आहे. हा दंड, वरील अधिनियमाच्या कलम 27(2) चे उल्लंघन केल्याबद्दल लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3205 | |