Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (100.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 08/06/2018
दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

जून 8, 2018

दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(2) व (4) सह वाचित कलम 47अ(1)(अ) व (क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि सिकंदराबाद को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना रु.2,50,000/- (रुपये दोन लाख पन्नास हजार) दंड लावला आहे. हा दंड ऑटोमेटेड टेलर मशीन्स (एटीएम), सुधारित सुपरवायजरी अॅक्शन फ्रेमवर्क (एसएएफ) खाली वरील बँकेवर घातलेले निर्बंध, एक्सपोझर नॉर्म्स, ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन व भारतीय रिझर्व बँकेला खोटी माहिती देणे आणि तपासणी दरम्यान संबंधित रेकॉर्ड्स उपलब्ध न केल्याबद्दल लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3224

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä