जून 12, 2018
‘आरबीआयची वेबसाईट सोडून अन्य स्त्रोतांमधून मिळालेल्या नोकर भरती संबंधित संदेशां’ बाबत नोकरी-इच्छुक व्यक्तींना आरबीआयचा सावधानतेचा इशारा
ह्या बँकेच्या नजरेस आले आहे की, काही तत्वशून्य व्यक्ती, स्वतः आरबीआयमधील अधिकारी असल्याचे भासवून, आरबीआयमध्ये नेमणुक होण्यासाठीचा एक नोकर भरतीचा भाग म्हणून, खोट्या लेटरहेड्सवर आणि खोट्या ई-मेल अॅड्रेसेस मधून, नोकरी इच्छुक व्यक्तींना, परीक्षा/इंटरव्ह्यु/इंटरॅक्टिव सेशन्सना हजर राहण्याबाबत संदेश पाठवीत आहेत.
आरबीआय येथे स्पष्ट करीत आहे की, भरती संबंधीची माहिती, म्हणजे जाहिरात, अर्ज सादर करण्याची रीत, परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षा केंद्रांची यादी, प्रवेशपत्र, निकाल इत्यादि, आरबीआयच्या https://www.rbi.org.in वेबसाईटवरच प्रसारित केली जात असते. ह्यासाठी, आरबीआयमधील नोकर भरती संबंधाने इतर स्त्रोतांकडून आलेल्या अशा संदेशात बळी न पडण्याचा इशारा जनतेला देण्यात येत आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3253 |