10 जुलै 2018
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश-
दि आर. एस. को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने, दिनांक 24 जून, 2015 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने दि आर. एस. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 26 जून, 2015 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून, दिशा-निर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली होती आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 19 जानेवारी, 2018 च्या सुधारित निर्देश अनुसार, दिनांक 25 जुलै 2018 पर्यंत वाढवण्यात आलेला होता, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन होता.
जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 24 जून, 2015 रोजी दिलेले निर्देश व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशांचा वैधता कालावधी जो दिनांक 25 जुलै 2018 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 02 जुलै 2018 च्या सुधारित निर्देशा द्वारा दिनांक 26 जुलै 2018 ते दिनांक 25 जनवरी 2019 पर्यंत सहा महिन्यांसाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
दिनांक 02 जुलै 2018 च्या सुधारित आदेशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा आदेशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.
अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता
प्रेस प्रकाशनी: 2018-2019/90 |