27 जुलाई 2018
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश-
दि कपोल को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 30 मार्च 2017 रोजी दिलेल्या निदेशच्या अनुषंगाने दि कपोल को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 30 मार्च, 2017 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिदेश लादण्यात आले होते. निदेशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निदेशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 20 मार्च 2018 च्या सुधारित निदेश अनुसार दिनांक 31 जुलाई 2018 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 30 मार्च, 2017 रोजी दिलेल्या निदेश व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निदेशा अनुसार निदेशाचा वैधता कालावधी जो दिनांक 31 जुलाई, 2018 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 23 जुलाई 2018 च्या सुधारित निदेश द्वारा दिनांक 1 अगस्त 2018 ते दिनांक 31 जनवरी 2019 पर्यंत सहा महिन्यांसाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
संदर्भाधीन निदेशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 23 जुलाई 2018 च्या सुधारित निदेशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निदेशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.
अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता
प्रेस प्रकाशनी: 2018-2019/237 |