Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (240.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/07/2018
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश- दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

27 जुलै 2018

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश-
दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 एप्रिल, 2014 रोजी दिलेल्या निदेश च्या अनुषंगाने दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 2 मे, 2014 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिदेश लादण्यात आले होते. निदेशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निदेशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 26 मार्च, 2018 च्या सुधारित निदेश अनुसार दिनांक 31 जुलै 2018 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निदेश व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निदेशा अनुसार निदेशाचा वैधता कालावधी जो दिनांक 31 जुलै 2018 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 23 जुलै 2018 च्या सुधारित निदेश द्वारा दिनांक 1 अगस्त, 2018 ते दिनांक 30 नवम्बर, 2018 पर्यंत चार महिन्यासाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

संदर्भाधीन निदेशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 23 जुलै 2018 च्या सुधारित निदेशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निदेशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता

प्रेस प्रकाशनी: 2018-2019/245

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä