23 अगस्त 2018
साहेबराव देशमुख को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई – दंडित (आर्थिक दंड)
भारतीय रिजर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन अधिनियम 1949, (सहकारी संस्थांना लागू) च्या कलम 47A(1)(c) च्या तरतुदी अंतर्गत (सोबत वाचा कलम 46 (4)) निहित अधिकारांचा वापर करून, भारतीय रिजर्व्ह बँके ने संचालक, नातेवाइक व व्यवसायांना कर्ज देण्या संबंधित जारी केलेल्या निर्देशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल साहेबराव देशमुख को- ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई ला ₹ 5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र) चा आर्थिक दंड ठोठावला आहे.
भारतीय रिजर्व्ह बँकेने उपरोक्त बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती, जिला भारतीय रिजर्व्ह बँकेने उपरोक्त बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती, जिला बँकेने लेखी उत्तर दिले होते, तसेच बँकेने अधिक स्पष्टीकरण सादर केले होते. वरील प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून आणि उपरोक्त बँकेने दिलेले लेखी उत्तर व स्पष्टीकरण विचारात घेउन, भारतीय रिजर्व्ह बँक या निष्कर्षावर आली आहे, की सदर बँकेचे उल्लंघन हे गंभीर स्वरूपाचे असून, आर्थिक दंडाची आकारणी करण्याचा निर्णय योग्य आहे.
अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता
प्रेस प्रकाशनी: 2018-2019/449 |