ऑक्टोबर 03, 2018
मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि. दावणगेरे, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ च्या तरतुदींखाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, मिल्लाथ को-ऑपरेटिव बँक लि., दावणगेरे, कर्नाटक ह्यांचेवर रु.15.00 लाख (रुपये पंधरा लाख) दंड लागु केला आहे. तो दंड, संचालक व त्यांच्या नातेवाईकांना कर्जे व अग्रिम राशी मंजुर करण्यावरील आरबीआयने दिलेले निर्देश/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन, कोणत्याही कागदपत्रांशिवाय वाहन कर्जे/कर्मचा-यांना कर्जे देणे, प्रति महिना रु.10.00 लाखांपेक्षा अधिक रकमेचे एकूण रोख व्यवहार, भारत सरकारच्या दिल्ली येथील वित्तीय माहिती खात्याला न कळविणे ह्यासाठी लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने वैय्यक्तिक सुनावणीची विनंती केली. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेचे सादरीकरण विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/765
|