फेडरल बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु |
ऑक्टोबर 03, 2018
फेडरल बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व बँकेने, आदेश दि. सप्टेंबर 25, 2018 अन्वये, फेडरल बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.50 दशलक्ष दंड लागु केला असून तो दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (तो अधिनियम) कलम 19(2) चे उल्लंघन करणे, आरबीआयने, (अ) सेंट्रल रिपॉझिटरी ऑफ इन्फर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स ह्यांना माहिती कळविणे (ब) आरबीएसखाली मूल्यमापनासाठी आरबीआयला कळविणे (क) एटीएम संबंधित ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यामधील विलंबासाठी भरपाई प्रदान करणे आणि (ड) तुमचा ग्राहक जाणा/अँटी मनी लॉडरिंग (केवायसी/एएमएल) नॉर्म्स ह्यावर दिलेल्या निर्देशांचे अनुपालन न करणे ह्यासाठी लावण्यात आला आहे. वरील/त्या अधिनियमाच्या तरतुदींचे व आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे, वरील बँकेने पालन न केल्याने, त्या अधिनियमाच्या कलम 46(4)( i) सह वाचित कलम 47(अ)(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.
ही कारवाई विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्याच्याशी संबंधित नाही.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/778
| |