दि बिजनोर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बिजनोर ह्यांना दंड लागु |
ऑक्टोबर 04, 2018
दि बिजनोर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बिजनोर ह्यांना दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि बिजनोर अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बिजनोर ह्यांना, ह्या अधिनियमाच्या कलम 27 आयबीआयडी खाली आवश्यक असल्यानुसारचे अहवाल सातत्याने सादर न केल्याकारणाने रु.10,00,000/- (रुपये दहा लाख) दंड लागु केला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे उत्तरही सादर केले नव्हते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/784 |
|