Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (125.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/10/2018
हरदोई जिल्हा सहकारी बँक लि., हरदोई, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 11, 2018

हरदोई जिल्हा सहकारी बँक लि., हरदोई, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, हरदोई जिल्हा सहकारी बँक लि., हरदोई, उत्तर प्रदेश ह्यांचेवर रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला असून तो दंड, ह्या अधिनियमाच्या कलम 19 खाली, इतर सहकारी सोसायट्यांमधील भाग धारणांवरील निर्बंधांवरील आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणे व ह्या अधिनियमाच्या कलम 31 खाली, ऑडिटरच्या रिपोर्टसह, लेखा व ताळेबंद प्रसिध्द/सादर न करणे ह्यासाठी लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/857

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä