मंड्या सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मंड्या, कर्नाटक - ह्यांचेवर आर्थिक दंड लागु |
ऑक्टोबर 25, 2018
मंड्या सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मंड्या, कर्नाटक - ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी बँकांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, मंड्या सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मंड्या ह्यांना रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेने तिच्या एका सिटिंग संचालकाच्या नातेवाईकाला कर्जे मंजुर करुन, आरबीआयच्या निर्देश/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने वैय्यक्तिक सुनावणीसाठी विनंती केली होती. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने दिलेले सादरीकरण विचारात घेऊन रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने केल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/971 |
|