एनएसडीएल पेमेंट्स बँक लिमिटेड कडून कार्यकृतींची सुरुवात |
ऑक्टोबर 29, 2018
एनएसडीएल पेमेंट्स बँक लिमिटेड कडून कार्यकृतींची सुरुवात
ऑक्टोबर 29, 2018 पासून एनएसडीएल पेमेंट्स बँक लिमिटेड ह्यांनी, एक पेमेंट्स बँक म्हणून कार्यकृती सुरु केल्या आहेत. भारतामध्ये एक पेमेंट्स बँकेचा व्यवसाय करण्यास, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22(1) खाली भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला परवाना दिला आहे.
ऑगस्ट 19, 2015 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्याप्रमाणे, एक पेमेंट्स बँक स्थापन करण्यास तात्विक मंजुरी देण्यात आलेल्या 11 अर्जदारांमध्ये, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, मुंबई हे एक अर्जदार होते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/991 |
|