नोव्हेंबर 2, 2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि कराड
जनता सहकारी बँक लि., कराड, महाराष्ट्र - मुदतवाढ
निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-4/12.22.126/2017-18 दि. नोव्हेंबर 7, 2017 अन्वये, दि कराड जनता सहकारी बँक लि., कराड ह्यांना नोव्हेंबर 9, 2017 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून, सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/क्र.डी-40/12.22.126/2017-18 दि. मे 3, 2018 अन्वये वरील निर्देशांची वैधता आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 9, 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक येथे अधिसूचित करते की, मे 3, 2018 दिनांकित निर्देशान्वये वैधता वाढविण्यात आलेल्या वरील बँकेला देण्यात आलेला आदेश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-4/12.22.126/2017-18 दि. नोव्हेंबर 7, 2017, वरील बँकेला आणखी चार महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 10, 2018 ते मार्च 9, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.
संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
वरील मुदतवाढ निर्देशित करणा-या निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/क्र.डी-17/12.22.126/2018-19 दि. ऑक्टोबर 30, 2018 ची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्यांचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1040 |