नोव्हेंबर 5, 2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक
लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) - मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) ह्यांना दिलेल्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांची, म्हणजे नोव्हेंबर 11, 2018 ते मे 10, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर मुदतवाढ दिली आहे. वरील बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली, निर्देश दि. जुलै 3, 2017 अन्वये, जुलै 10, 2017 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून, निर्देशांखाली ठेवण्यात आली आहे.
ह्या उपरिर्निदिष्ट निर्देशात, आरबीआयचा निर्देश दि. ऑक्टोबर 30, 2018 अन्वये बदल करण्यात आले/त्याची वैधता वाढविण्यात आली. शेवटून नोव्हेंबर 10, 2018 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या निर्देशांची वैधता, निर्देश दि. ऑक्टोबर 30, 2018 रोजीच्या निर्देशान्वये पुनरावलोकनाच्या अधीन आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 11, 2018 ते मे 10, 2019 पर्यंत वाढविण्यात आली. ऑक्टोबर 30, 2018 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
ह्या निर्देशाची वैधता वाढविण्यात आली ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या वित्तीय स्थितीत सुधारणा किंवा घट झाली आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1050
|