Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (135.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/11/2018
दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांचेवर आरबीआयकडून निर्देश लागु.

नोव्हेंबर 09, 2018

दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांचेवर आरबीआयकडून निर्देश लागु.

भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.पीसीसी.डी-4/12.26.004/2018-19 दि. नोव्हेंबर 2, 2018 अन्वये) दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अडूर, केरळ ह्यांना निर्बंधांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, प्रत्येक बचत खाते किंवा चालू खाते किंवा कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, रु.2,000/- (रुपये दोन हजार) काढण्याची परवानगी, आरबीआयच्या निर्देशात दिलेल्या अटींवर, ठेवीदारांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे दि अडूर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., रिझर्व बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे व अग्रिम राशी देऊ/किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन व नवीन ठेवी स्वीकारुन कोणतीही जबाबदारी/दायित्व घेणार नाही, तिचे दायित्व व जबाबदारी म्हणून किंवा अन्यथा कोणत्याही रकमेचे वाटप करणार नाही किंवा वाटप करण्यास राजी होणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, नोव्हेंबर 2, 2018 रोजीच्या आरबीआयच्या निर्देशात अधिसूचित केल्या व्यतिरिक्त, तिच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा वासलात करणार नाही. नोव्हेंबर 9, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांसाठी हे निर्देश जारी असतील.

रिझर्व बँकेने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1087

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä