नोव्हेंबर 15, 2018
शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेले निर्देश - मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-6/12.22.351/2017-18 दि. मे 18, 2018 च्या निर्देशान्वये), शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना मे 19, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) ने तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/डी-19/12.22.351/2018-19 दि. नोव्हेंबर 12, 2018 अन्वये, वर दिलेले निर्देश, वरील बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे मे 19, 2019 पर्यंत लागु असतील.
वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या दि. नोव्हेंबर 12, 2018 च्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या ह्या मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1127
|