नोव्हेंबर 27, 2018
श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून, तो दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ खाली भारतीय रिझर्व बँकेने दिलेले निर्देश, आणि अनुपालन अहवाल सादर करण्यावरील सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेले असल्याच्या कारणामुळे लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1212 |