नोव्हेंबर 27, 2018
दि नेल्लोर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., नेल्लोर, आंध्रप्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि नेल्लोर को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., नेल्लोर, आंध्रप्रदेश ह्यांचेवर रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लागु केला असून, तो दंड, भारतीय रिझर्व बँकेच्या सुधारित पर्यवेक्षणीय कृती साचाखाली (एसएएफ), वरील बँकेवर घातलेल्या पर्यवेक्षणीय निर्बंधांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1213 |