नोव्हेंबर 29, 2018
अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. मैनपुरी, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. मैनपुरी, उत्तर प्रदेश, ह्यांचेवर रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, गुंतवणुकींचे एचटीएम/एएफएस/एचएफटी प्रकारात वर्गीकरण करण्यावरील आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे, आंतर बँकीय ग्रॉस एक्सपोझर व काऊंटर पार्टी मर्यादा उत्पन्न ओळख - अॅसेट वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर संबंधित बाबी - युसीबीज वरील प्रुडेंशियल नॉर्म्स ह्यांचे उल्लंघन केल्या कारणाने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1241
|