Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (135.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/11/2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

नोव्हेंबर 30, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना मे 2, 2014 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून, निर्देश दि. एप्रिल 30, 2014 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता संबंधित निर्देशांद्वारे वेळोवेळी वाढविण्यात आली होती व शेवटचा निर्देश जुलै 23, 2018 रोजीचा असून तो निर्देश, पुनरावलोकनाच्या अटीवर, नोव्हेंबर 30, 2018 पर्यंत वैध होता.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देत आहे की, वेळोवेळी सुधारित केलेले एप्रिल 30, 2014 चे व शेवटून दि. नोव्हेंबर 30, 2018 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले वरील बँकेला दिलेले निर्देश, नोव्हेंबर 27, 2018 रोजीच्या निर्देशान्वये, त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे, डिसेंबर 1, 2018 ते फेब्रुवारी 28, 2019 पर्यंत लागु असतील.

वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या निर्देश दि. नोव्हेंबर 27, 2018 ची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1252

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä