नोव्हेंबर 30, 2018
पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि. देऊळगावराजा, बुलढाणा ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने पीपल्स को-ऑपरेटिव बँक लि. देऊळगावराजा, बुलढाणा, ह्यांचेवर रु.75,000/- (रुपये पंचाहत्तर हजार) दंड लागु केला असून, तो दंड, बँकेच्या कोणत्याही संचालकांना कोणतेही कर्ज किंवा अग्रिम राशी देण्यावरील मनाई ह्यासंबंधित, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 20 मधील तरतुदींचे उल्लंघन करणे ह्यासाठी आणि एक्सबीआरएल रिपोर्टिंग सिस्टिम खाली चुकीचे अहवाल देणे ह्यासाठी लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1255 |