Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (130.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/11/2018
रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

नोव्हेंबर 30, 2018

रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश दि. नोव्हेंबर 27, 2018 अन्वये) आणखी तीन महिन्यांची म्हणजे, डिसेंबर 1, 2018 ते फेब्रुवारी 28, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर मुदतवाढ दिली आहे. हे निर्देश, मूलतः फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत घालण्यात आले होते आणि त्या निर्देशांना आठ वेळा प्रत्येकी सहा महिन्यांची व सहा वेळा प्रत्येकी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ तीन महिन्यांसाठी म्हणजे, सप्टेंबर 1, 2018 ते नोव्हेंबर 30, 2018 पर्यंतची होती.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हे निर्देश जारी केले होते. ह्या निर्देशांची एक प्रत संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशाचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. त्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1254

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä