एसबीएम बँक (मॉरिशस) लि. इंडिया च्या, एसबीएम बँक (इंडिया) लि. बरोबर एकत्रीकरण करण्यास आरबीआयची मंजुरी |
डिसेंबर 1, 2018
एसबीएम बँक (मॉरिशस) लि. इंडिया च्या, एसबीएम बँक (इंडिया) लि. बरोबर एकत्रीकरण करण्यास आरबीआयची मंजुरी
भारतीय रिझर्व बँकेने, एसबीएम बँक (मॉरिशस) लि. इंडिया ह्यांच्या संपूर्ण उपक्रमाचे, एसबीएम बँक (इंडिया) लि. ह्यांचे बरोबरच्या एकत्रीकरण योजनेस मंजुरी दिली असून एसबीएम बँक (इंडिया) लि. ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22(1) खाली संपूर्ण मालकीची दुय्यम रीत (डब्ल्युओएस) द्वारे, भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यास रिझर्व बँकेने परवाना दिला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 44अ च्या पोटकलम (4) मध्ये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन ही योजना मंजुर करण्यात आली आहे.
ही योजना डिसेंबर 1, 2018 पासून जारी होईल. डिसेंबर 1, 2018 पासून, एसबीएम बँक (मॉरिशस) लि. इंडियाच्या सर्व शाखा, एसबीएम बँक (इंडिया) लि. च्या शाखा म्हणून कार्य करतील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1267 |
|