डिसेंबर 6, 2018
मुझफ्फरनगर जिल्हा सहकारी बँक लि., मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने मुझफ्फरनगर जिल्हा सहकारी बँक लि., मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश, ह्यांचेवर रु.50,000 (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, ह्या अधिनियमाच्या कलम 19 खाली, इतर सहकारी सोसायट्यांमध्ये शेअर्स धारण करण्यावरील, आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1315
|