डिसेंबर 11, 2018
भारतीय रिझर्व बँकेकडून इंडियन बँकेवर आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), आदेश दि. नोव्हेंबर 30, 2018 अन्वये, इंडियन बँक (ती बँक) ह्यांचेवर रु.1 कोटी दंड लागु केला असून, तो दंड, आरबीआयने दिलेले सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक्स वरील परिपत्रक दि. जून 2, 2016; आणि फसवणुकी - वाणिज्य बँकांकडून वर्गीकरण व अहवाल ह्यावरील महानिर्देश दि. जुलै 1, 2016 चे उल्लंघन केले गेल्याने लागु करण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचना व मार्गदर्शक तत्वांचे वरील बँकेने अनुसरण न केल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(आय) सह वाचित, कलम 47 (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे.
ही कारवाई विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, त्या बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेशी संबंधित नाही.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1345 |