Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (131.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/12/2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र - मुदतवाढ

डिसेंबर 24, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र - मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, जनतेच्या हितासाठी, एप्रिल 1, 2013 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून, श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांचेवर निर्देश लागु केले होते. भारतीय रिझर्व बँकेने ह्या निर्देशांना तीन महिन्यांची म्हणजे डिसेंबर 30, 2018 ते मार्च 28, 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशाची एक प्रत बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व बँक करु शकते. हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व बँकेने त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1448

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä