Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (156.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/12/2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - निकासी मर्यादेत शिथिलता

डिसेंबर 27, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - निकासी मर्यादेत शिथिलता

दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, एप्रिल 17, 2018 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून, निर्देश दि. एप्रिल 17, 2018 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता त्यानंतरच्या निर्देशांन्वये वेळोवेळी वाढविण्यात आली होती व शेवटच्या दि. ऑक्टोबर 15, 2018 रोजीच्या निर्देशान्वये ही वैधता, पुनरावलोकनाच्या अटीवर एप्रिल 17, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती. विद्यमान निर्देशांनुसार, इतर अटींबरोबर, प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव असलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून रु.1,000/- पर्यंतची रक्कम काढण्यास ठेवीदाराला परवानगी देण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) व (2) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन येथे निर्देश देते की -

दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना देण्यात आलेल्या व निर्देश दि. ऑक्टोबर 15, 2018 अन्वये सुधारित केलेल्या, निर्देश दि. एप्रिल 17, 2018 च्या निर्देशाचा परिच्छेद 1(1) पुढीलप्रमाणे सुधारित केला जावा.

“(i) प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा मुदत ठेव खाते किंवा अन्य (कोणतेही नाव दिलेले) ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, रु.5,000/- (रुपये पाच हजार) पर्यंतची रक्कम ठेवीदार काढू शकतो - मात्र, अशा ठेवीदारावर त्या बँकेचे कोणत्याही प्रकारचे दायित्व असल्यास, म्हणजे कर्जदार किंवा हमीदार, बँकेतील ठेवींविरुध्द घेतलेली कर्जे, ती रक्कम प्रथम संबंधित कर्ज खात्यांमध्ये समायोजित केली जावी. “

वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या निर्देश दि. एप्रिल 17, 2018 मधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

वरील मुदतवाढ अधिसूचित केलेल्या दि. डिसेंबर 12, 2018 च्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, त्या बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1472

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä