डिसेंबर 31, 2018
जानेवारी 1, 2019 पासून सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी - एमएफआयकडून आकारण्यात येणारा, लागु असलेला सरासरी बेस-रेट
भारतीय रिझर्व बँकेने आज कळविले आहे की, अबँकीय वित्तीय कंपन्या - सूक्ष्म वित्त संस्थांकडून (एनबीएफसी - एमएफआय) त्यांच्या कर्जदारांना, जानेवारी 1, 2019 पासून सुरु होणा-या तिमाहीसाठीचा, लागु असलेला सरासरी बेस रेट 9.15 टक्के असेल.
येथे स्मरण व्हावे की, भारतीय रिझर्व बँकेने परिपत्रक दि. फेब्रुवारी 7, 2014 मध्ये एनबीएफसी - एमएफआयना, कर्जाच्या मूल्यासंबंधाने सांगण्यात आले होते की, प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस, एनबीएफसी-एमएफआयकडून, तिच्या कर्जदारांना, पुढील तिमाहीत आकारावयाचे व्याजदर काढण्यासाठी, रिझर्व बँक, पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस रेट्सची सरासरी कळवील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1499 |