जानेवारी 03, 2019
वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) सार्वजनिक निवेदन दि. ऑक्टोबर 19, 2018
वित्तीय कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) तिच्या सभासदांना व इतर अधिकार क्षेत्रांना सांगितले आहे की त्यांनी, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाच्या (डीपीआरके) अधिकार क्षेत्रातून सातत्याने व लक्षणीयतेने निर्माण होत असलेल्या मनी लाँडरिंग व टेररिस्ट फायनान्सिंगच्या (एमल/एफटी) धोक्यांपासून आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीचे संरक्षण करण्यासाठी, प्रतिउपाय लागु करावेत. अशा अधिकार/कार्य क्षेत्रांपासून निर्माण होणा-या धोक्यांच्या प्रमाणात अधिकतर प्रयास/कष्ट घेऊन उपाय करण्यासाठी इराणच्या अधिकार क्षेत्रातील सभासदांना असा एफएटीएफ इशारा (कॉल) देणे आवश्यक आहे. एफएटीएफने पुढील अधिकारक्षेत्रे निवडली/ओळखली आहेत की जेथे आणीबाणीच्या त्रुटींमुळे, त्यांचा सामना करण्यासाठी, एफएटीएफ बरोबर एक कृती योजना तयार केली आहे. ही अधिकारक्षेत्रे म्हणजे, बहमास, बोत्सवाना, इथियोपिया, घाना, पाकिस्तान, सर्बिया, श्रीलंका, सिरिया, त्रिनिदाद व टोबॅगो, ट्युनिशिया आणि येमेन.
ही माहिती, एफएटीएफने, ऑक्टोबर 19, 2018 रोजी वितरित केलेल्या अद्यावत सार्वजनिक निवेदनात व पत्रकात उपलब्ध आहे. हे निवेदन व पत्रक पुढील युआरएलमध्ये अॅक्सेस केले जाऊ शकते –
(1) http://www.fatf-gafi.org/publications/high-riskandnon-cooperativejurisdictions/documents/public-statement-october-2018.html
व
(2) http://www.fatf-gafi.org/publications/high-riskandnon-cooperativejurisdictions/documents/fatf-compliance-october-2018.html
अँटी मनी लाँडरिंग (एएमएल)/दहशतवादाला वित्तसहाय्याशी सामना (सीएफटी) मध्ये आणीबाणीच्या त्रुटी असलेली अधिकारक्षेत्रे ओळखून त्यांच्याबरोबर काम करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एफएटीएफ प्लेनरी, ‘इंप्रुव्हिंग ग्लोबल कंप्लायन्स : ऑन गोईंग प्रोसेस’ ह्या शीर्षकाचे एक सार्वजनिक निवेदन व पत्रक वितरित करीत असते. हे निवेदन व पत्रक एफएटीएफच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यात निर्देशित केलेल्या देशांशी व अधिकारक्षेत्रांशी व्यावसायिक व्यवहार व कायदेशीर व्यापार करण्यासाठी, विनियमित संस्थांना प्रतिबंध नाही.
एफएटीएफ संबंधाने
वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) ही तिच्या सभासद अधिकारक्षेत्रांच्या मंत्र्यांनी, 1989 साली स्थापन केलेली एक आंतर-सरकार संस्था आहे. एफएटीएफची उद्दिष्टे म्हणजे, आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीच्या एकात्मतेला असलेल्या मनी लाँडरिंग, दहशतवादाला अर्थसहाय्य, व इतर आव्हाने/धोके ह्यांच्याशी सामना करण्यासाठी मानके निश्चित करणे आणि कायदेशीर, विनियामक कार्यकारी उपायांची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन देणे. आवश्यक त्या उपायांची अंमलबजावणी करण्यातील प्रगतीवर एफएटीएफ देखरेख करते, मनी लाँडरिंग व दहशतवाद्यांना अर्थ सहाय्य करण्याच्या तंत्रांचे व प्रति-उपायांचा आढावा घेते आणि जागतिक दृष्टीने सुयोग्य उपाय व त्यांची अंमलबजावणी ह्यांना प्रोत्साहन देते. एफएटीएफ प्लेनरी ही एफएटीएफची निर्णय घेणारी संस्था/सभा वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाते आणि येथे नोंद घ्यावी की निवेदनेही अद्यावत करते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1548
|