Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (120.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 07/01/2019
दि युथ डेवलपमेंट को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

जानेवारी 07, 2019

दि युथ डेवलपमेंट को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आयI/डी-6/12.22.311/2018-19 दि. जानेवारी 4, 2019 अन्वये) युथ डेवलपमेंट को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना, निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, ठेवीदारांना त्यांचे प्रत्येक बचत किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, आरबीआयच्या निर्देशामधील अटींनुसार, रु.5,000/- (रुपये पाच हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. युथ डेवलपमेंट को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र ही बँक, रिझर्व बँकेकडून लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी मंजुर किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतीही जबाबदारी घेऊ शकणार नाही; तिचे दायित्व किंवा जबाबदारी म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करु शकणार नाही किंवा करण्यास राजी असणार नाही; आरबीआयने जानेवारी 4, 2019 रोजी दिलेल्या निर्देशात अधिसूचित केले असल्याच्या व्यतिरिक्त, कोणतीही तडजोड किंवा व्यवस्था करुन, तिची कोणतीही मालमत्ता किंवा अॅसेट्सची विक्री किंवा हस्तांतरण करुन किंवा अन्यथा वासलात लावू शकणार नाही. हे निर्देश, जानेवारी 5, 2019 रोजीचे वरील बँकेचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी जारी असतील.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर आधारित ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली रिझर्व बँकेला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. ह्या निर्देशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1580

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä