Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (138.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/01/2019
श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद (तेलंगाना) ह्यांचेवर आरबीआयकडून निर्देश लागु

जानेवारी 11, 2019

श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद (तेलंगाना) ह्यांचेवर आरबीआयकडून निर्देश लागु

श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद (तेलंगाना) ह्यांना जनतेच्या हिताच्या दृष्टीने काही निर्देश देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देत आहे की, श्री भारती को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद (तेलंगाना), जानेवारी 2, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून रिझर्व बँकेकडून लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी मंजुर किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतीही जबाबदारी घेऊ शकणार नाही; तिचे दायित्व किंवा जबाबदारी म्हणून किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करु शकणार नाही किंवा करण्यास राजी असणार नाही. खाली दिलेली व्याप्ती व रीत ह्या व्यतिरिक्त, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा व्यवस्था करुन तिची मालमत्ता किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा वासलात करु शकणार नाही

(i) प्रत्येक बचत बँक खाते, किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लकेमधून ठेवीदाराला रु.1,000/- (रुपये एक हजार) काढण्यास परवानगी दिली जावी - मात्र अशा ठेवीदारावर बँकेचे कोणत्याही प्रकारचे दायित्व असल्यास, म्हणजे, कर्जदार किंवा हमीदार, ती रक्कम प्रथम त्या कर्ज खात्यात समायोजित केली जावी.

(ii) विद्यमान मुदत ठेवींचे त्यांच्या परिपक्वतेनंतर त्याच नावाने व त्याच क्षमतेमध्ये नूतनीकरण केले जाऊ शकते.

(iii) संदर्भित निर्देशांमध्ये परवानगी दिली असल्यानुसार खर्च केला जाऊ शकतो.

(iv) सरकार/एसएलआर कडून मंजुरी दिलेल्या प्रतिभूतींमध्ये गुंतवणुक केली जाऊ शकते.

भारतीय रिझर्व बँकेने विशेष लेखी मंजुरी दिली असल्याशिवाय, वरील बँक कोणतीही जबाबदारी घेणार किंवा समाप्त करणार नाही.

संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेची परिस्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. हे निर्देश, जानेवारी 2, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुनरावलोकनाच्या अटीवर जारी असतील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1630

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä