Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (129.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/01/2019
बँक ऑफ महाराष्ट्र ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

जानेवारी 16, 2019

बँक ऑफ महाराष्ट्र ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) आदेश दि. जानेवारी 4, 2019 अन्वये, बँक ऑफ महाराष्ट्र (ती बँक) ह्यांचेवर रु.10.00 दशलक्ष दंड लागु केला असून, तो दंड, जुलै 1, 2016 रोजीचे, फसवणुकी वर्गीकरण न कळविणे ह्यावरील आरबीआयचे महानिर्देश आणि फेब्रुवारी 25, 2016 रोजीचे (जुलै 8, 2016 रोजी अद्यावत केलेले), तुमचा ग्राहक जाणावर आरबीआयने दिलेले महानिर्देश ह्यांचे अनुपालन न केले गेल्याने लागु करण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे त्या बँकेकडून अनुपालन न केले गेल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(आय) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड जारी करण्यात आला आहे.

ही कारवाई, विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित असून, त्या बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या करारांशी किंवा व्यवहारांशी संबंधित नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1670

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä