Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (131.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 22/01/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि. - मुदतवाढ

जानेवारी 22, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि. - मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, जनतेच्या हितासाठी, युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि., बागनान स्टेशन रोड (उत्तर), पोस्ट ऑफिस-बागनान, जिल्हा - हावरा, पिन - 711303 पश्चिम बंगाल ह्यांना, जुलै 18, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देश दिले होते व ते निर्देश जानेवारी 18, 2019 पर्यंत वैध होते. जनतेच्या हितासाठी, आता भारतीय रिझर्व बँकेने ह्या निर्देशांना जानेवारी 19, 2019 ते जुलै 18, 2019 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1712

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä