जानेवारी 24, 2019
भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., वरुड, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु
भारतीय रिझर्व बँकेने, जानेवारी 17, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून, भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., वरुड, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र ह्यांना, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देश दिले आहेत.
ह्या निर्देशांनुसार, भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., वरुड, जिल्हा अमरावती, भारतीय रिझर्व बँकेची लेखी पूर्व-मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन किंवा नवीन ठेवी स्वीकारण्यासह कोणतीही जबाबदारी निर्माण करणार नाही, तिचे दायित्व व जबाबदारी पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा कोणतेही प्रदान करणार नाही किंवा करण्यास राजी होणार नाही, रिझर्व बँकेच्या निर्देशांमध्ये अधिसूचित केलेले सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तांची विक्री, हस्तांतरण करणार नाही किंवा अन्यथा वासलात लावणार नाही. ह्याशिवाय, वरील बँक तिच्या प्रत्येक ठेवीदाराच्या बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा इतर कोणत्याही ठेव खात्यातील एकूण शिल्लकेमधून रु.2,000/- (रुपये दोन हजार) पर्यंतची रक्कम, जानेवारी 17, 2019 पासूनच्या ह्या निर्देशांच्या सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ एकाच वेळी काढण्यास ठेवीदारांना परवानगी देऊ शकते.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949(एएसीएस) च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम 1 खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने हे निर्देश लागु केले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.
शैलजा सिंग
सहाय्यक महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1737 |