Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (132.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 31/01/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

जानेवारी 31, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई ह्यांना मार्च 30, 2017 च्या निर्देशान्वये मार्च 30, 2017 रोजीचे व्यवहार बंद झाल्यानंतर, सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. जुलै 23, 2018 च्या निर्देशान्वये, वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी, जानेवारी 31, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम 1 खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, जुलै 23, 2018 च्या निर्देशान्वये वैधतेमध्ये वाढ केलेले, वरील बँकेला मार्च 30, 2017 रोजी देण्यात आलेले निर्देश, वरील बँकेला, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, फेब्रुवारी 1, 2019 पासून ते जुलै 31, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असणे सुरु राहील.

वरील निर्देशाच्या अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

वरील मुदतवाढ दिली असलेले निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी.क्र.डी-29/12.22.111/2018-19 दि. जानेवारी 24, 2019 ची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

ह्या मुदतवाढीचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1798

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä