बिदर महिला को-ऑपरेटिव बँक लि., बिदर, कर्नाटक ह्यांना आर्थिक दंड लागु |
फेब्रुवारी 4, 2019
बिदर महिला को-ऑपरेटिव बँक लि., बिदर, कर्नाटक ह्यांना आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, बिदर महिला को-ऑपरेटिव बँक लि., बिदर ह्यांना, त्यांनी संचालक व त्यांचे विहित नातेवाईक ह्यांना कर्जे देण्यावरील आरबीआयच्या विद्यमान नॉर्म्सचे उल्लंघन केले असल्याबाबत रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1830
| |