Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (97.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/02/2019
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना - पशुपालन व मत्स्यपालन उद्योगांसाठी कार्यकारी भांडवल

फेब्रुवारी 4, 2019

किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना - पशुपालन व मत्स्यपालन उद्योगांसाठी कार्यकारी भांडवल

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश, शेतक-यांना लघु मुदतीच्या पीक कर्जांसाठी, लवचिक व सुलभ कार्यरीतीद्वारे एकाच खिडकीतून बँकिंग प्रणालीकडून पुरेसे व वेळेवर कर्ज सहाय्य उपलब्ध करुन देणे हा आहे. ह्या योजनेची कार्यकारी लवचिकता, पशुपालन व मत्स्यपालन उद्योग करणारांनाही मिळावी ह्यासाठी अशा शेतक-यांनाही केसीसीच्या ह्या सुविधा दिल्या जाण्याबाबतचा निर्णय, भारत सरकारने, 2018-19 च्या अंदाजपत्रकात घोषित केला होता. ह्या बाबीची तपासणी करण्यात आली व सर्व स्टेक होल्डर्सशी विचार विनिमय केल्यानंतर ठरविण्यात आले की, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) च्या सुविधा, पशुपालन करणारे शेतकरी व मत्स्यपालन करणारांनाही त्यांच्या कार्यकारी भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्या जाव्यात.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1839

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä