फेब्रुवारी 5, 2019
श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि. चंद्रपुर ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि. चंद्रपुर ह्यांचेवर रु. 1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लागु केला असून, हा दंड, आरबीआयने दिलेल्या कार्यकारी सूचनांचे पालन वरील बँकेने केले नसल्याने लागु करण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1852
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä