फेब्रुवारी 12, 2019
भारतीय रिझर्व बँकेकडून चार बँकांवर आर्थिक दंड लागु
आदेश दि. जानेवारी 31, 2019 अन्वये, खालील चार बँकांवर, निधींची देखरेख व अंतिम वापर, इतर बँकांबरोबर माहितीची देवाण-घेवाण, फसवणुकींचे वर्गीकरण व रिपोर्टिंग आणि खात्यांची पुनर्रचना ह्यावर भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने दिलेल्या निरनिराळ्या निर्देशांचे पालन न केले गेल्याने आर्थिक दंड लावला आहे.
अनु.क्र. |
बँकेचे नाव |
दंडाची रक्कम (दशलक्ष मध्ये) |
1. |
अलाहबाद बँक |
15 |
2. |
आंध्र बँक |
10 |
3. |
बँक ऑफ महाराष्ट |
15 |
4. |
इंडियन ओव्हरसीज बँक |
15 |
आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे अनुपालन वरील बँकांनी केले नसल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4) (आय) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे दंड लावण्यात आले आहेत.
ही कारवाई विनियमनात्मक त्रुटींवर आधारित असून, त्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी संबंधित नाही.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1915 |