श्री शक्तिकांत दास, गव्हर्नर ह्यांची सही असलेल्या रु.100 च्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) बँक नोटांचे वितरण |
फेब्रुवारी 26, 2019
श्री शक्तिकांत दास, गव्हर्नर ह्यांची सही असलेल्या रु.100 च्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवी) बँक नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, गव्हर्नर श्री शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील रु.100 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन सर्व बाबतीत महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील रु.100 च्या नोटांप्रमाणेच असेल. भारतीय रिझर्व बँकेने भूतकाळात दिलेल्या रु.100 च्या बँक नोटा कायदेशीर चलन असणे सुरुच राहील.
जोस जे. कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2029
| |