Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (132.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/02/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

फेब्रुवारी 28, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, मे 2, 2014 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, निर्देश दि. एप्रिल 30, 2014 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतरच्या निर्देशान्वये, शेवटचे निर्देश दि. नोव्हेंबर 27, 2018 ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व ते निर्देश पुनरावलोकनाच्या अटीवर, दि. फेब्रुवारी 28, 2019 पर्यंत वैध होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला दिलेले वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून फेब्रुवारी 28, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश एप्रिल 30, 2014 रोजीचे निर्देश, निर्देश दि. फेब्रुवारी 26, 2019 अन्वये, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजे, मार्च 1, 2019 ते मे 31, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या फेब्रुवारी 26, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दिलेली मुदतवाढ आणि/किंवा सुधारणा ह्यांचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2059

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä