फेब्रुवारी 28, 2019
डीबीएस बँक लि. इंडियाचे डीबीएस बँक इंडिया लि. बरोबरच्या एकत्रीकरण्यास आरबीआयची मंजुरी
भारतीय रिझर्व बँकेने, डीबीएस बँक लि. इंडियाच्या संपूर्ण उपक्रमाचे, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड बरोबर एकत्रीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. डीबीएस बँक इंडिया लि. ह्यांना, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22(1) खाली, संपूर्ण मालकीची दुय्यम संस्था (डब्ल्युओएस) प्रकारामार्फत, भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठी परवाना दिला आहे. ही योजना बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 44 अ च्या पोटकलम (4) मध्ये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन मंजुर करण्यात आली आहे.
ही योजना मार्च 1, 2019 पासून अंमलात येईल. डीबीएस बँक लि. इंडिया च्या भारतामधील सर्व शाखा, मार्च 1, 2019 पासून, डीबीएस बँक इंडिया लि. च्या शाखा म्हणून कार्य करतील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2064 |