मार्च 1, 2019
यु.पी.पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, यु.पी.पोस्टल प्रायमरी को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांचेवर, रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून तो दंड, क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे सभासदत्व, आंतर बँकीय प्रति-पक्ष मर्यादा वरील प्रुडेंशियल नॉर्म्स, उत्पन्न ओळख, मालमत्ता वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर बाबी - युसीबी, केवायसी/एएमएल मार्गदर्शक तत्वे, गुंतवणुक व्यवहारांचे काँकरंट ऑडिट ह्यावर आरबीआयने दिलेली केवायसी/एएमएल वरील सूचना/मार्गदर्शक तत्वे, बँकेच्या दैनंदिन व्यवहारातील संचालकांचा हस्तक्षेप आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 29 ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2076 |