Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (132.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/03/2019
राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., झाशी, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मार्च 1, 2019

राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., झाशी, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., झाशी, उत्तर प्रदेश ह्यांचेवर, रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून तो दंड, क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे सभासदत्व, आंतर बँकीय प्रति-पक्ष मर्यादा वरील प्रुडेंशियल नॉर्म्स संचालक मंडळाची ऑडिट समिती, उत्पन्न ओळख, मालमत्ता वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर बाबी - युसीबी, केवायसी/एएमएल मार्गदर्शक तत्वे, गुंतवणुक व्यवहारांचे काँकरंट ऑडिट ह्यावर आरबीआयने दिलेली सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2075

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä