मार्च 6, 2019
इटावा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., इटावा (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, इटावा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., इटावा (युपी) ह्यांचेवर, रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून हा दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 36(1) खाली दिलेल्या पर्यवेक्षणीय सूचना व कार्यक्षेत्र, शाखा प्राधिकृतीकरण धोरण, एक्सटेंशन काऊंटर्स उघडणे/अद्यावत करणे, एटीएम्स व कार्यालयांचे शिफ्टींग/विभाजन/बंद करणे ह्या संबंधीच्या आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2116 |