महोबा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., महोबा (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु |
मार्च 6, 2019
महोबा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., महोबा (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, महोबा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., महोबा (युपी) ह्यांचेवर, रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून तो दंड, आंतर बँकीय ढोबळ एक्सपोझर व प्रतिपक्ष मर्यादा वरील प्रुडेंशियल नॉर्म्स ह्यावरील आरबीआयच्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व त्या बँकेने त्यावर दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2117 |
|