Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (104.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 11/03/2019
इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

मार्च 11, 2019

इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), इंडियन मर्कंटाईल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांची, मार्च 12, 2019 ते सप्टेंबर 11, 2019 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली, दिलेला निर्देश दि. जून 4, 2014 अन्वये वरील बँक, जून 12, 2014 पासून निर्देशाखाली ठेवण्यात आली आहे.

आरबीआयचे निर्देश दि. जुलै 30, 2014, डिसेंबर 8, 2014, जून 2, 2015, सप्टेंबर 7, 2015, ऑक्टोबर 19, 2015, डिसेंबर 7, 2015, मार्च 4, 2016, सप्टेंबर 2, 2016, नोव्हेंबर 25, 2016, मार्च 9, 2017, सप्टेंबर 1, 2017, मार्च 6, 2018 आणि सप्टेंबर 7, 2018 अन्वये वरील निर्देश आरबीआयकडून सुधारित करण्यात/वैधता वाढविण्यात आली होती. सर्वात शेवटी, मार्च 11, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या निर्देशाला आणखी सहा महिन्यांची, म्हणजे, मार्च 12, 2019 ते सप्टेंबर 11, 2019 पर्यंतची मुदतवाढ, निर्देश दि. मार्च 5, 2019 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर देण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी मार्च 5, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने निर्देशात बदल केला ह्याचा अर्थ, वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारली किंवा वाईट झाली असल्याचे समजण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2152

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä