Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (111.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/03/2019
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र

मार्च 14, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - वसंतदादा नागरी सहकारी बँक
लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र.

जनतेच्या हितासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खाली, तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना नोव्हेंबर 13, 2017 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व बँकेने आता ह्या निर्देशांची मुदत तीन महिन्यांसाठी म्हणजे मार्च 14, 2019 ते जून 13, 2019 पर्यंत वाढविली आहे. ह्या निर्देशात ठेवींचा स्वीकार/निकासी ह्यावर काही निर्बंध आणि/किंवा मर्यादा घालण्यात आल्या होत्या. संबंधित जनतेच्या माहितीसाठी हे सविस्तर निर्बंध वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. तिची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत वरील बँक बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2190

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä